पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

 

‘मी देशासाठी काय केले याचा विचार करा’: नंदकुमार सातुर्डेकर यांचे आवाहन

 

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा दिवस केवळ आनंदाचा नसून, इतिहासाची, बलिदानाची आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा आहे, असे सातुर्डेकर यांनी यावेळी सांगितले.

सातुर्डेकर म्हणाले, “१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून आणि संघर्षातून मिळाले आहे. आता आपली जबाबदारी आहे की, ‘देशाने माझ्यासाठी काय केले?’ असा विचार करण्याऐवजी ‘मी देशासाठी काय केले?’ याचा विचार करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे.” प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केल्यास देश महासत्ता बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला विज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सीएसआर प्रमुख विजय वावरे, निवृत्त पोलिस अधिकारी अनिल गालींदे, मोहन लोंढे, गजानन चिंचवडे, पुरुषोत्तम डबीर, सुनील पोटे आणि मल्लाप्पा कस्तुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान केंद्राच्या उपक्रमांची माहिती

संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांनी विज्ञान केंद्राविषयी माहिती दिली. या केंद्राला दरवर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमी भेट देतात. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया यांनी सांगितले की, ‘आर्यभट्ट ते गगनयान’ हे विशेष प्रदर्शन १२ ते २४ ऑगस्टपर्यंत सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम