
पिंपळेसिम येथील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपळेसिम येथील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
धरणगाव : तालुक्यातील पिंपळे सिम येथील रहिवासी व धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील हायस्कूलमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेले विजय गोपाल साळवे (वय ३७) रा. पिंपळे सिम यांनी दि. २४ रोजी दुपारी ३ वाजे सुमारास पिंपळे सिम येथील राहत्या घरात गळ फास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी त्यांचा मावसा लोटन रामचंद्र अंभोरे हे घरी गेल्याने त्यांच्या निदर्शनास आले.
शिक्षक मयत विजय साळवे यांची आईचे चंद्रकला साळवे यांचे दोन वर्षांपूर्वी आजारपणाने निधन झाले होते. त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर शिक्षक म्हणून
नियुक्तीसाठी विजय साळवे यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांचे भाऊ सतीश साळवे हे प्रायव्हेट फायनान्स कंपनीत काम करतात तसेच त्यांच्या पारंपरिक व्यवसाय सुद्धा करतात होते. कै. विजय साळवे हे सध्या झुरखेडा हायस्कूल झुरखेडा तालुका धरणगाव येथे शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
विजय साळवे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असून मित्र मंडळींच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणारा मित्र गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली असता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम