
पिंप्राळा रोडवर वृद्धाला बोलण्यात गुंतवून ६० हजारांच्या अंगठ्या लंपास
पिंप्राळा रोडवर वृद्धाला बोलण्यात गुंतवून ६० हजारांच्या अंगठ्या लंपास
जळगाव : शहरातील पिंप्राळा रोड परिसरात सोमवारी सायंकाळी एका वृद्धाला बोलण्यात गुंतवून दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्याची घटना उघडकीस आली. या अंगठ्यांची किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुन्नीलाल दौलत पाटील (वय ६८) हे आपल्या कुटुंबासह पिंप्राळा रोड परिसरात राहतात. सोमवारी (१५ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ते घराजवळ उभे असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आले. बोलण्यात गुंतवून त्यांनी पाटील यांच्या दोन अंगठ्या चोरल्या.
यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (१६ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता पाटील यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम