पिंप्राळा हुडको परिसरात १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

पिंप्राळा हुडको परिसरात १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या आकीब शहा निसार शहा (वय १८) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१९ मे २०२५) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकीब शहा हा सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी एकटाच होता. त्याने अज्ञात कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घरच्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम