
पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन व व्यावसायिक कौशल्य कार्यशाळा संपन्न
पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन व व्यावसायिक कौशल्य कार्यशाळा संपन्न
जळगाव, (प्रतिनिधी) –
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाच्या वतीने पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी “करिअर समुपदेशन व व्यावसायिक कौशल्य” या विषयावर दिनांक २५ जुलै रोजी विद्यापीठात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत चित्रकार सचिन मुसळे, प्रा. एस. आर. चौधरी, आंतरराज्य सायकलिस्ट स्वप्निल मराठे, तसेच कामिनी धांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी केले.
चित्रकार सचिन मुसळे यांनी सांगितले की, छंद हेच भविष्यातील करिअर ठरू शकतात, मात्र त्यासाठी सातत्यपूर्ण सराव आणि कठोर मेहनत आवश्यक असते. त्यांनी चित्रकलेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
सायकलिस्ट स्वप्निल मराठे व कामिनी धांडे यांनी सायकलिंगमधील करिअरच्या संधी, तसेच फिटनेससाठी सायकलच्या नियमित वापराचे फायदे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमात प्राचार्य सोना कुमार यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, नियमित अभ्यास व स्वअनुशासनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार व प्रिती सोज्वल यांनी केले, तर आभारप्रदर्शन पूजा पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिनाक्षी पाटील, विद्या हिवराळे, योगेश राठोड, प्रतिभा पाटील, सीमा पाटील, समाधान अहिरे व लता सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम