पुढच्या चौकात सोडतो’ म्हणत २५ हजारांची रोकड लंपास; दोन चोर फातिमा नगरातून अटकेत

बातमी शेअर करा...

‘पुढच्या चौकात सोडतो’ म्हणत २५ हजारांची रोकड लंपास; दोन चोर फातिमा नगरातून अटकेत

जळगाव,  – “पुढच्या चौकात सोडतो” असे सांगत एका वयोवृद्ध शेतकऱ्याला कारमध्ये बसवून त्यांच्याच खिशातील २५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार कालिंका माता चौफुली ते अजिंठा चौफुली दरम्यान घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

भास्कर शंकर पाटील (वय ७०, रा. पहूर, ता. जामनेर) हे आपल्या चारचाकी वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी जळगावला आले होते. त्यांनी कालिंका माता मंदिर परिसरातील एका गॅरेजवर गाडी दिल्यानंतर पायी अजिंठा चौफुलीकडे निघाले. याच दरम्यान एक कार त्यांच्या शेजारी येऊन थांबली. चालकाने “पुढच्या चौकात सोडतो” असे सांगून त्यांना गाडीत बसवले.

कारमध्ये बसल्यानंतर पाटील यांच्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने हातचलाखी करत त्यांच्या खिशातील २५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर दोघांनी पाटील यांना अजिंठा चौफुलीवर उतरवले आणि पसार झाले. काही वेळात रोकड चोरीस गेल्याचे लक्षात येताच पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि फातिमा नगर येथून अर्शद शेख रज्जाक (३०) व अतऊर रहमान मोहम्मद सलीम (३४) या दोघांना ताब्यात घेतले.

पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम