पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

बातमी शेअर करा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन

पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव, दि. २८ ऑगस्ट,  – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर ई-प्रशासन मंडळ, पुणे मार्फत नामांक ने सादर करण्यासाठी अर्ज (परीशीष्टे-१) उपलब्ध बाबत (सन २०२५-२६) (जाहीर सूचना)

पाणी वापर संस्थांना आवाहन

महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा सन सन २०२५/२६ करीता अभियाना बाबत ई-प्रशासन मंडळ, पुणे मार्फत नामांकने सादर करण्यासाठी ऑनलाइन नामांकन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सर्व कार्यान्वित पाणी वापर संस्था यांनी या पुरस्कार स्पर्धेत सक्रीय सहभाग घ्यावा.

सदर स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येणार असुन या स्पर्धेसाठी अ) मोठे / मध्यम प्रकल्प आणि ब) लघु प्रकल्प / कोल्हापूर पध्दतीचे बंधारे / साठवण तलाव / कालवा / नदीवरील वैयक्तीक अथवा सहकारी उपसा अशा दोन गटांमध्ये राज्यस्तरीय स्तरावर प्रथम व व्दितीय असे ४ पुरस्कार, तसेच प्रत्यके महामंडळाची भौगोलिक परीस्थती व सिंचन व्यवस्था वेगळी असल्याने पाच महामंडळ स्तरावर वरील दोन गटांमध्ये प्रथम व व्दितीय याप्रमाणे २० पुरस्कार असे एकत्रित २४ पुरस्कार प्रदान करण्यात येतील, यावरील कार्यान्वित असलेल्या पाणी वापर संस्थाकडुन नामांकने मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेसाठी इच्छुक पाणी वापर संस्थानी सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडे दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ च्या आत नामांकने (प्रस्ताव) दाखल करावीत.

सदर योजनेअंतर्गत सुधारणा करून राज्यस्तरीय दोन्ही गटामध्ये प्रथम व व्दितीय, प्रथम क्र.-रू ५ लक्ष व प्रशस्ती पत्र व व्दितीय क्र. रू ३ लक्ष व प्रशस्ती पत्र असे एकुण चार पुरस्कार एकुण रक्कम-१६ लक्ष महामंडळ स्तरावर दोन्ही गटामध्ये महामंडळ स्तरावर पुरस्कार प्रत्येकी प्रथम क्र.रू-२ लक्ष व प्रशस्ती पत्र व व्दितीय क्र. रू १ लक्ष व प्रशस्ती पत्र तसेच सिंचन व्यवस्थापन व पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे उत्कृष्ट काम करणारे उपअभियंता व त्यांच्या खालिल दर्जाचे अधिकारी व सिंचन कर्मचारी यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील, पुरस्कार वितरण समारंभ दर वर्षी सिंचन दिनी २६ फेब्रुवारी रोजी वितरीत करण्यात येतील स्पर्धा ५ वर्षा साठी राहील.

तसेच सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पाणी वापर संस्था यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन              मा. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अध्यक्ष (खान्देश प्रदेश) यांनी केले आहे. सदर नामांकनासाठीचे (प्रस्तावासाठीचे) विहीत नमुन्यातील प्रपत्र सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता/उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. असे कार्यकारी अभियंता                 (अ.गि. कुलकर्णी) जळगांव पाटबंधारे विभाग, जळगांव तथा सदस्य सचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा खान्देश प्रदेश स्तरीय समिती  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम