
पुण्यातील चौका -चौकात झळकले रविकांत तुपकरांच्या स्वागताचे बॅनर..
तुपकरांच्या स्वागतासाठी पुण्यातील तरुणाई सरसावली..!
पुण्यातील चौका -चौकात झळकले रविकांत तुपकरांच्या स्वागताचे बॅनर..
तुपकरांच्या स्वागतासाठी पुण्यातील तरुणाई सरसावली..!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या स्थापनेनंतर पहिलीच राज्यव्यापी बैठक होणार पुण्यात…!
पुणे /बुलढाणा प्रतिनिधी
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या स्थापनेनंतर राज्य कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात ३ मार्च रोजी होत आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी पुण्यातील स्थानिक कार्यकर्ते व तरुणाई कामाला लागली आहे. या राज्यव्यापी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विविध प्रमुख चौकांमध्ये शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून राज्यभर ओळख असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या स्वागताचे फलक आणि डिजिटल बॅनर झळकले आहेत.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊस, कांदा, दूध यासह इतर विषयांवर विचार मंथन करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थित क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापीबैठक सोमवार 3 मार्च रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरु होणार आहे. या राज्यव्यापी बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुपकरांचे प्रमुख शिलेदार उपस्थित राहणार आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटना या संघटनेची रविकांत तुपकारांनी नव्याने स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी रविकांत तुपकर यांनी राज्यभर चळवळ मजबूत करण्याचा निर्धार केला असून राज्यभर संघटन वाढविण्यासाठी रविकांत तुपकर कामाला लागले आहेत. संघटनेच्या स्थापनेनंतर राज्य कार्यकारिणीची पहिलीच बैठक पुण्यात होत असल्याने पुण्यातील स्थानिक कार्यकर्ते व तरुण मोठ्या उत्साहाने या बैठकीच्या तयारीला लागले आहेत. पुण्यातील तरुणाई व कार्यकर्त्यांनी या बैठकीची जोरदार तयारी केली असून पुण्यातील प्रमुख चौकांमध्ये रविकांत तुपकरांच्या स्वागताचे डिजिटल बॅनर आणि फलक देखील लावलेले दिसून येत आहेत. या बैठकीसाठी कार्यकर्त्यांचा विशेष करून तरुणांचा जोरदार पाठिंबा आणि उत्साह दिसून येत आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्याच्या कोअर कमिटीची तसेच प्रदेशाध्यक्ष व इतर महत्त्वपूर्ण पदांच्या नियुक्तीची घोषणा देखील रविकांत तुपकर या बैठकीत करणार आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊस, कांदा, दूध यासह इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरली जाणार आहे, या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर मोठ्या आंदोलनाची घोषणा देखील करू शकतात, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम