पुण्यात गेलेल्या वृद्ध दांपत्याच्या बंद घरातून १ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा...

पुण्यात गेलेल्या वृद्ध दांपत्याच्या बंद घरातून १ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास
जळगाव प्रतिनिधी शहरातील शांतीनिकेतन परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध दांपत्याच्या बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करून दागिने व रोकड असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. वृद्ध दांपत्य पुण्यात मुलाकडे गेल्याची संधी साधून ही घटना घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शांतीनिकेतन नगर येथे राहणारे शंकर रामचंद्र इंदानी (वय ६९) हे आपल्या पत्नीसोबत १३ ऑगस्टपासून पुण्यात मुलाकडे गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला. बुधवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रील वाकवून घरात प्रवेश केला व लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

घटनेची माहिती समजताच शंकर इंदानी यांनी गुरुवारी (२१ ऑगस्ट) सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम