पूरग्रस्त भागात चोपडा तालुक्यातील दानशूर व्यक्तीकडून मदत रवाना

बातमी शेअर करा...

पूरग्रस्त भागात चोपडा तालुक्यातील दानशूर व्यक्तीकडून मदत रवाना

चोपडा : शेतकरी कृती समिती व तालुक्यातील नागरिकांनी पूर ग्रस्तासाठी गोळा केलेली मदत दि.१२ रोजी संध्याकाळी ६ वाजेला पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आली.

पूरग्रस्तांसाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी वह्या गोळा केल्यात तर इतर दानशूर व्यक्तींच्या मदतीने वह्या, पेन ताट, ग्लास, पांघरायला रग, अश्या साहित्यांचे २५० किट व सोबत पाच हजार वह्या असे मदतीचे साहित्य गोळा झाले होते. दि.१२ रोजी ते साहित्य घेऊन गाडी नांदूर हवेली, खामगाव, हिरापूर या १००% बुडीत गावांमध्ये रवाना

झाली. उद्या येथील शाळांमध्ये अॅड. कुलदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, योगेश दुसाने, गुणवंत सोनवणे यांच्या समक्ष तेथे वाटप होणार असून गाडी रवाना करताना एस बी पाटील, डॉ. सुभाष देसाई, हरिश्चंद्र देशमुख, प्रा. प्रदीप पाटील, नारायण बोरोले, काशिनाथ महाजन, प्रा. सागर धनगर, विपीन बोरोले, प्रदीप सोनार, हरीभाऊ गुजर, अजित पाटील, धनंजय पाटील, मोहित बोरोले, प्राचार्य आर. बी वाघजाळे, प्रा.ए.एन बोरसे, डॉ. रवींद्र पाटील, गणेश पाठक हजर होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम