पैसे न दिल्याच्या रागातून मुलाकडून वृद्ध पित्याला मारहाण

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील घटना

बातमी शेअर करा...

पैसे न दिल्याच्या रागातून मुलाकडून वृद्ध पित्याला मारहाण
भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी): रिटायरमेंटच्या रकमेतून दोन लाख रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकूड मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे घडली.

 

दिलीप गणपत महाजन (वय ६२) हे आपल्या कुटुंबासह कंडारी येथे राहतात. त्यांचा मुलगा हेमंत महाजन गावातच घराचे बांधकाम करत होता. त्यासाठी त्याने वडिलांकडे रिटायरमेंटच्या पैशांतून दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र, दिलीप महाजन यांनी पैसे देण्यास नकार दिला.

यामुळे संतापलेल्या हेमंत महाजनने वडिलांच्या डोक्यात लाकडाने जोरदार वार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. ही घटना ६ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता घडली.

 

दिलीप महाजन यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, हेमंत दिलीप महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास बाविस्कर करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम