पैसे न दिल्याच्या रागातून तरुणावर फायटरने हल्ला; दोन दात पडले, जीवेठार मारण्याची धमकी

बातमी शेअर करा...

पैसे न दिल्याच्या रागातून तरुणावर फायटरने हल्ला; दोन दात पडले, जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव – पैसे न दिल्याच्या रागातून एकाने तरुणावर फायटरने बेदम मारहाण करत तोंडातील दोन दात पडेल इतकी गंभीर दुखापत केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता कानळदा रोड परिसरात घडली. या प्रकरणी शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैय्यद आसिफ सैय्यद नूर (वय ३०, रा. शिवाजीनगर, कानळदा रोड, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्याकडे ओळखीचा तनवीर उर्फ तन्या शेख (रा. गेंदालाल मिल, जळगाव) हा आला. त्याने काही कारणास्तव पैसे मागितले. मात्र पैसे न दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तनवीर याने हातातील फायटरने आसिफवर तोंडावर, डोक्यावर आणि पाठीवर वार केले.

या मारहाणीत सैय्यद आसिफच्या तोंडातील दोन दात पडले असून, इतर ठिकाणीही गंभीर जखमा झाल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून तनवीर उर्फ तन्या शेख याच्याविरोधात गंभीर मारहाणीचा आणि जीवेठार धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम