
पोददार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे “कारगिल विजय दिवस” उत्साहात साजरा
पोददार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे “कारगिल विजय दिवस” उत्साहात साजरा
जळगाव, पोददार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे आज “कारगिल विजय दिवस” राष्ट्रभक्तीच्या भावनेने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल युद्धातील भारतीय लष्कराच्या अभूतपूर्व विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमात शहीद जवानांना अभिवादन करून विविध देशभक्तिपर कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वेदांत सोनवणे व गायत्री चौधरी या विद्यार्थ्यांनी सुत्रसंचालन करत केली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी ‘लेहराके झूमेगा तिरंगा’ हे देशभक्तिपर गीत सादर करून उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवली. इयत्ता नववीच्या रितेश राणे याने आपल्या प्रभावी भाषणातून कारगिल युद्धातील वीर जवानांचे शौर्य, त्याग व बलिदान यांचे हृदयस्पर्शी चित्र उभे केले. त्याने शहीद कुटुंबांच्या योगदानाचेही स्मरण करून, त्यांच्या गौरवासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
प्राचार्य श्री. गोकुळ महाजन यांनी प्रतीकात्मक अमर जवान ज्योतीस पुष्पचक्र अर्पण करून मौन पाळून वीर शहीदांना श्रद्धांजली वाहिली. उपप्राचार्य श्री. दीपक भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, वीर जवानांच्या शौर्याचे स्मरण करत देशासाठी निष्ठेने कार्य करण्याचे महत्व अधोरेखित केले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम