
पोदार प्रेप येथे स्नेहसंमेलन उत्साहात
विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्य
पोदार प्रेप येथे स्नेहसंमेलन उत्साहात
विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्य
जळगाव I प्रतिनिधी
पोदार प्रेप येथे दिनांक १७ जानेवारी स्नेहसंमेलन घेण्यात. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. पंकज पाटील एमडीएस बालरोग दंतचिकित्सा उपस्थित होते. ह्या वर्षी ‘कहानी और कला उत्सव जंबो के संग” ह्या विषयाला अनुसरून घेण्यात आला या कार्यक्रमात चिमुकल्यांनी विविध राज्ये व त्याची संस्कृतीचे त्यांच्या संस्कृतीचे दर्शन हे विविध पोषाख परिधान करून दाखविले. यात महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा बिहार, तेलंगणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश अशा राज्यांचा समावेश करण्यात आला होता.
यात विदयार्थ्यांनी अनेक गाण्यांवर नृत्य केले. यात पालक आजी-आजोबांनी सुद्धा विदयार्थ्यांसोबत नृत्य केले. अश्या प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न आला या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य श्री गोकूळ महाजन सर व शाळेच्या मुख्याध्यापिका उमा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार सर व शाळेचे कार्यकार्य अधिकारी श्री जितेंद्र कापडे सर हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम