
पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे ‘मेगा टिंकरिंग डे’ उत्साहात साजरा
पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे ‘मेगा टिंकरिंग डे’ उत्साहात साजरा
जळगाव— प्राचार्य गोकुळ महाजन व उपप्राचार्य दीपक भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एटीएल इंचार्ज . राकेश निम्बोळे, सौ. सायली टेणी, सौ. तेजल महाजन आणि सौ. काजल सुल्ताने यांच्या सहकार्याने पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे ‘मेगा टिंकरिंग डे’ हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. हा उपक्रम भारत सरकारच्या नीति आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत देशभर राबविण्यात आला असून, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व नाविन्यपूर्ण विचारसरणी विकसित करणे हा यामागचा उद्देश होता.
हा कार्यक्रम 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत घेण्यात आला. या वेळी ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. एकूण 50 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले — त्यापैकी 45 विद्यार्थी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे आणि 5 विद्यार्थी ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलचे होते.
नीति आयोगामार्फत थेट प्रक्षेपित सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रत्यक्ष प्रयोग केले व एक कार्यक्षम व्हॅक्युम क्लिनर मॉडेल तयार केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आणि नाविन्यपूर्ण विचारांची जोपासना झाली.
‘मेगा टिंकरिंग डे’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण क्षमतांना नवी दिशा देणारा मंच मिळाला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम