
पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे ‘‘राष्ट्रभाषा हिंदी दिवस’’ उत्साहात साजरा!
जळगाव : हिंदी भाषेचा गौरव व सन्मान जपण्यासाठी दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी ‘‘हिंदी दिवस’’ साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे ‘‘राष्ट्रभाषा हिंदी दिवस’’ विविध सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य श्री. गोकुळ महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रस्तावना विद्यार्थिनी कु. सम्बुल खान व कु. रिया कुमार यांनी सादर केली. इयत्ता पाचवीतील जान्हवी व हर्षिता यांनी हिंदी कवितांचे सुंदर वाचन केले, तर सहजवीर सिंग व स्वधा भामरे यांनी सुभाषिते व घोषवाक्ये प्रभावीपणे मांडली. इयत्ता आठवीतील कु. मेघना शिरसाठ हिने भाषणातून हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित केले.
हिंदी विषय प्रमुख सौ. रंजना गवळी यांनी आपल्या भाषणातून हिंदी भाषेची समृद्ध परंपरा स्पष्ट केली व राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदीचा अभिमानाने वापर करण्याचे आवाहन केले.
प्राचार्य श्री. गोकुळ महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभावान सादरीकरणाचे कौतुक करत सर्वांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास उप-प्राचार्य श्री. दीपक भावसार, पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ, शिक्षकवृंद, समन्वयक व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम