
पोदार शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
भाषणातून शिवजयंती दिनाचे महत्व व्यक्त
जळगाव प्रतिनिधी
पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती दिन उत्साहात साजरा करण्यात आली .
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. देवदत्त गोखले ( डायरेक्टर ऑफ गोखलेस् ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जळगाव) यांनी द्वीप प्रज्वलनाने सरस्वती पूजन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत ‘गारद’ स्वरूपात आगमन झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले आणि त्यांनी आपल्या भाषणातून शिवजयंती दिनाचे महत्व व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी समूह गीत, नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन वेधून घेतल. आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘गड आला पण सिंह गेला’ या नाटिका द्वारे सुभेदार तानाजी मालसुरे यांच्या बलिदानाचा इतिहास रंगमंचावर प्रस्तुत करून ऐतिहासिक काळातील आठवणींना उजागर केल्या.
इयत्ता नववीचा विद्यार्थी निर्भय शिंपी याने आपले भाषणातून स्वराज्य प्राप्तीचा इतिहास वर्णिला.माजी विद्यार्थी संकेत गांगुर्डे यांनी आपल्या भाषणातून शिवकालीन घटनांचे वर्णन केले.कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोकुळ महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राची गाथा वर्णिली.कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक श्री. दीपक भावसार , मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ, शाळेचे व्यवस्थापन जितेंद्र कापडे, समन्वयक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची जबाबदारी अक्षदा घुले, पृथ्वीराज हजारे, जसीता पाटील, भुषण पाटील आणि मोहम्मद तल्हा या विद्यार्थ्यांनी पार पाडली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हर्षदा सोनवणे या विद्यार्थिनीने पार पाडले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम