पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

महाबली हनुमान कि शौर्यगाथा सादर

बातमी शेअर करा...

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात
महाबली हनुमान कि शौर्यगाथा सादर
जळगाव I प्रतिनिधी
जळगाव पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘महाबली हनुमान कि शौर्यगाथा आज जल्लोषात संपन्न झाले. शाळेचे उप-प्राचार्य दीपक भावसार यांनी शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

या प्रसंगी शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तसेच शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी यांचे स्वागत केले.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवी श्री सरस्वती मूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलनाने शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी,पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणीक,स्पर्धा परीक्षा,क्रीडा प्रकार तसेच कला ई. क्षेत्रात महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य गोकुळ महाजन यांनी शाळेचा वार्षिक अहवाल पालकांसमोर प्रस्तुत केला.


शाळेचे प्राचार्यगोकुळ महाजन यांनी पोदार स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून नियमितपणा,सराव, जिद्द व चिकाटीने केलेले कोणतेही काम विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे म्हणून अथक प्रयत्न करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मांडले. पालकांशी संवाद साधताना आदर्श पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले.यावर्षी ‘महाबली हनुमान की शौर्यगाथा’ संकल्पना थोडक्यात मांडली आणि पालकांनी पाठींबा देवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा अशी विनंती केली.तसेच एजुकेशन वर्ल्ड द्वारे भारतात प्रतम मानाकीत शिक्षण संस्था असा सन्मान मिळाला आहे.जागतिक दर्जाचे फुटबॉल पटू जिमी नाईट यांची शाळेश भेट येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार असून फुटबाल खेळाविषयी त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे अशी माहिती पालकांना दिली.

दर्जेदार शिक्षणासोबत प्रगत विचार ,परंपरागत मूल्यांचे आणि संस्कृती संवर्धन हे संस्थेचे ध्येयवाक्य असून या वर्षीच्या ‘‘महाबली हनुमान की शौर्यगाथा’’ या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी विविध नाटिका,नृत्ये सादर केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकच नव्हे तर कलागुणांनादेखील वाव मिळावा या उद्देशाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.

या रंगारंग कार्यक्रमातून महाबली हनुमान जन्मोत्सव,सूर्यदेवाला दिलेले आव्हान,मित्रांसोबत मौजमस्ती ,राम हनुमान भेट ते लंका दहन ह्या प्रसंगाचे नाटिका, नृत्य तसेच गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

विद्यार्थ्यांनी निवडलेले कार्यक्षेत्र आणि अंतिम ध्येय गाठण्यासाठी लागणारा आत्मविश्वास प्रत्यक्ष कृतीतून वृद्धिंगत होण्यासाठी या कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळाले. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करीत उत्तम नियोजनासाठी शालेय प्रशासनाची प्रशंसा केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे उपप्राचार्य दिपक भवसार ,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यिनी प्रतिनिधी कु.जिज्ञासा कुमत आणि कु. माही संघवी यांनी आभार प्रदर्शन केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम