पोलिसातील माणुसकीचे दर्शन! हरवलेली पर्स परत देत पो.नि. प्रदीप ठाकूर ठरले नागरिकांसाठी आदर्श

बातमी शेअर करा...

पोलिसातील माणुसकीचे दर्शन! हरवलेली पर्स परत देत पो.नि. प्रदीप ठाकूर ठरले नागरिकांसाठी आदर्श

पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे नागरिकांकडून कौतुक

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे उदाहरण घालून दिले आहे. नाकाबंदी दरम्यान एम. जे. कॉलेज परिसरात हरवलेली पर्स सुरक्षितपणे परत देत जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

सदर पर्समध्ये ₹२५,००० रोख रक्कम, आयफोन, तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्स तेथील एका नारळपाणी विक्रेत्याला सापडल्याने त्याने प्रामाणिकपणे ती नाकाबंदीवरील पोलिसांकडे सुपूर्द केली.

कर्तव्यावर असलेले पो.नि. प्रदीप ठाकूर यांनी तत्परता दाखवत पर्समधील कागदपत्रे आणि मोबाईलवरील माहितीच्या आधारे पर्सच्या मालकिणीचा शोध घेतला. त्याचदरम्यान, वर्षा पाटील नावाची महिला घाबरलेल्या अवस्थेत पळतच घटनास्थळी आली. तिच्या ओळखीची खात्री करून ठाकूर यांनी ती पर्स सुरक्षितपणे तिच्या स्वाधीन केली.

अचानक हरवलेली वस्तू परत मिळाल्याने भावनाविवश झालेल्या वर्षा पाटील यांनी पोलिसांचे पाय धरून आभार मानले. त्या नारळपाणी विक्रेत्यासही त्यांनी ₹५०० ची दिवाळी भेट देऊन त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

या घटनेतून पोलिस दलातील प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन नागरिकांना घडले आहे. शहरातील जनतेकडून या कृतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक आणि अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम