
पोलीस दलात फेरबदल ; पाच सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
पोलीस दलात फेरबदल ; पाच सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलिस दलातील पाच सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. या बदल्यांमुळे वाहतूक शाखेसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये प्रशासकीय फेरबदल झाले आहेत.
वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांची नशिराबाद पोलिस स्टेशनला प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निंभोरा पोलिस स्टेशनला सहायक पोलिस निरीक्षक बोचरे यांच्या जागी रावेर पोलिस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक मिरा देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.
कासोदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात रीडर म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक कार्यालयातील रीडर श्रीकांत पाटील यांची कासोदा पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे संबंधित पोलिस ठाण्यांच्या कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम