
पोलीस महासंचालकासह अधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस
खंडपीठात हजर राहण्याचे आदेश
जळगाव :प्रतिनिधी
मविप्र शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयात घुसून कागदपत्रे चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्यात अॅड. विजय भास्कर पाटील यांना बेकायदेशीररीत्या अटक केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलिस महासंचालकांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वांना २१ मार्च रोजी खंडपीठात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती अॅड. विजय भारकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. पाटील यांनी पुढे सांगितले की, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयातून कागदपत्रे चौरीप्रकरणी १५ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा सकाळी १०:४६ वाजता दाखल झाला, मात्र त्यापूर्वीच सकाळी ८ वाजता जिल्हापेठ पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत डांबून ठेवले व संध्याकाळी
वाजता अटक दाखवले. गुन्हा दाखल नसताना त्यापूर्वीच आपल्याला ताब्यात घेण्यात आले असून, लावलेले कलम पाच वर्षांच्या आत शिक्षा असलेले असून, त्यात अटक करता येत नाही, असा दावा त्यांनी केला. शिवाय ज्या रजिस्टरच्या चोरीप्रकरणी हा गुन्हा दाखल केला, ते रजिस्टर यापूर्वीच आपण जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जमा केले असून, तसा पंचनामाही असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम