पौष्टिक पदार्थांच्या माध्यमातून मुलांच्या हेल्थ ला वेल्थ मध्ये रूपांतरित करा – विष्णू मनोहर 

बातमी शेअर करा...
पौष्टिक पदार्थांच्या माध्यमातून मुलांच्या हेल्थ ला वेल्थ मध्ये रूपांतरित करा – विष्णू मनोहर 
      जळगाव – वाढत्या वयाच्या मुलांना डब्यात पौष्टिक व स्वास्थवर्धक पदार्थ देऊन त्यांच्या हेल्थ ला वेल्थ मध्ये रूपांतरित करावे असे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रतिपादन केले.
         रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि नवजीवन प्लस सुपर शॉप तर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन मध्ये आयोजित खाऊगप्पा या कार्यक्रमात मनोहर बोलत होते.
     यावेळी अध्यक्ष गौरव सफळे, प्रशासकीय सचिव महेश सोनी, प्रकल्प सचिव देवेश कोठारी, नवजीवन प्लस चे संचालक  अनिल कांकरिया, कांचन कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
             यावेळी गप्पा करताना विष्णू मनोहर यांनी भगर, बाजरी, ज्वारी, राजगिरा याची भाकरी द्यावी. भगर पिठीचा ढोकळा, पुरी भगरचे पकोडे, उपवासाचे प्रकार, सोयाबीनचे प्रकार किती वेळा खावे, सोया चंक त्याचा फायदा, चीज सोबत काय खावे, फुटाण्याचा लाडू, किसमिसचा लाडू याविषयी त्यांनी माहिती दिली.
      फळे एक तासानंतर खाऊ नये. ताजे पूर्ण फळ खावे. ब्रेड देखील घरी बनवता येतो. जंकफूड खाऊच नये. खायचे असल्यास आठवड्यातून एकदा घरी पौष्टिक पद्धतीने बनवून एन्जॉय करा.
     कोबी, पत्ता कोबी या भाज्या डब्यात देऊ नये असे सांगितले. त्यांनी चायनीज बनवताना हेल्दी कसे बनवावे. ब्रेडली पदार्थ कसा बनवला याचा किस्सा सांगितला. बरेच पदार्थ वेगळे कसे बनवावे हे देखील त्यांनी सांगितले.
    शेफ आहे याचा अर्थ सगळे येत असे नाही, विविध भागातील खाद्य संस्कृतीचा अभ्यास करून शिकता मात्र येते असे मनोहर यांनी सांगून नटसम्राट नाटकातील स्वागत ऐकवून डायट वरील कविता सादर केली. काहीही जास्त खाल्ल्यास त्रास होणारच असे सांगितले.
   कार्यक्रमास महिलांसह पुरुषांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना विष्णू मनोहर यांनी हसत खेळत गमतीदार पद्धतीने उत्तरे देत गप्पा मारल्या.
     कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात येऊन पाच विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
       प्रास्ताविक कांचन कांकरिया यांनी तर परिचय शिल्पा सफळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरिता खाचणे यांनी केले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम