प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचा उपक्रम

बातमी शेअर करा...

प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचा उपक्रम
जळगाव प्रतिनिधी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी अमळनेर येथील पिंपळे तालूक्यातील अनुदानित आश्रम शाळेत संपन्न झाला. या प्रदर्शनात 17 शासकीय व 34 अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपकरणे सादर केली.

यावेळी उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करण्यात आले होते ज्यात चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात अनुक्रमे 14, 12 आणि 26 उपकरणांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात अरुण पवार यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले

आणि प्रयोगशीलता व नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) दौऱ्यावर नेले जाईल असे त्यांनी जाहिर केले. समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय अनिल झोपे, प्राचार्य, डायट जळगाव यांनी भूषवले. यावेळी अनिल झोपे यांनी डायट जळगावच्या वतीने आदिवासी आश्रम शाळांसाठी शैक्षणिक मदत व सुधारणा यासाठी कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तीनही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया, यावल यांच्या वतीने इन्सिनरेटर भेट देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकचे क्षेत्रीय व्यवस्थापक धर्मेंद्र कुमार सिंग यावलचे शाखा व्यवस्थापक राधेश्याम ताराचंद मूंगमुळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. सी. डी. साळुंखे, विद्या पाटील, युवराज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे निरीक्षण व मूल्यांकन कार्य
विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे, बी. बी. ठाकरे व डी. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा प्रकल्प अधिकारी पवन पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल व अनुदानित आश्रम शाळा,
पिंपळे यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम