प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी, होमिओपॅथी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा...

प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी, होमिओपॅथी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि. १७ :  प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्था, जामनेरमार्फत चालवण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज आणि होमिओपॅथी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महाराष्ट्र विधानसभा नियम ९४ अन्वये विधानसभेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिले.

विधानसभा सदस्य विजय शिवतारे यांनी प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्था जामनेरच्या कामकाज संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित केली. या चर्चेत सदस्य सर्वश्री अमोल जावळे, मंगेश चव्हाण, अनुप अग्रवाल आदींनी सहभाग घेतला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले, या संस्थेच्या कामकाज संदर्भात सदस्यांनी उपस्थितीत केलेले मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. या संस्थेच्या कॉलेजमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी कॉलेज संदर्भातील अनियमित्तेबाबत आरोग्य विद्यापीठामार्फत  सात दिवसात चौकशी करून त्याबाबतची सुनावणी घेतली जाईल. तसेच शासन स्तरावरूनही आयुक्त व संचालक वैद्यकीय शिक्षण यांच्यामार्फतही चौकशी केली जाईल. या चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम