प्रजाशक्ती क्रांती दलाने उपोषणस्थळी साजरी केली ईद; शासनाची अनास्था उघड

बातमी शेअर करा...

प्रजाशक्ती क्रांती दलाने उपोषणस्थळी साजरी केली ईद; शासनाची अनास्था उघड

मुक्ताईनगर : प्रजाशक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी करकी (ता. मुक्ताईनगर) येथे प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात साखळी उपोषणास बसले आहेत. आज उपोषणाचा चौथा दिवस असूनही शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांनी संविधानिक पद्धतीने उपोषण स्थळीच गुढीपाडवा आणि ईद साजरी केली.

प्रजाशक्ती क्रांती दलाने प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्री गिरीश महाजन यांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपोषण स्थळी येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, ठरलेल्या वेळेनंतरही कोणतेही मंत्री अथवा वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. यानंतर उपोषणकर्त्यांनी परस्पर गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या आंदोलनाला संविधानिकरित्या पुढे नेले.

यावेळी करकी तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेले प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत गायकवाड यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोराज तायडे यांनी निरीक्षक गायकवाड यांचे आभार मानले.

उपोषण स्थळी संविधानिक पद्धतीने ईद साजरी करण्याचा हा अनोखा प्रकार पाहायला मिळाला. यावेळी प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोराज तायडे, राज्य अध्यक्ष पंकज सपकाळे, राज्य सचिव अॅड. सतीश मोरे, जळगाव युवा जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे, यासिन तडवी, इरफान तडवी, किशनदीन तडवी, वासुदेव भोई, कयुब तडवी, मीराबाई कोळी तसेच अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सरकारने त्वरित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष अशोराज तायडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम