
प्रताप विद्यामंदिरात परसबागेची निर्मिती .
प्रताप विद्यामंदिरात परसबागेची निर्मिती .
चोपडा ;- *शासनाच्या सुरू असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत, प्रताप विद्यामंदिर व कृषी तंत्र विद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला पिकांची परसबागेची निर्मिती केली आहे .त्यात विषमुक्त फवारणी म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला व निमार्क, दशपर्णी अर्क फवारणीने भाजीपालाचे उत्पादन घेतले जाते .सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या भाजीपाला हा आरोग्यासाठी पोषक ठरतो .यात कोणतेही कीटकनाशक फवारणी न करता वनस्पतीजन्य कीटकनाशक निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. त्यात गिलकी टोमॅटो. वांगी, मिरची, बटाटा, कडीपत्ता, अळूची पाने, अद्रक इत्यादी भाजपला पिकांची हंगामानुसार लागवड करून ती मध्यान्ह भोजनासाठी शालेय पोषण आहारात वापर केला जातो. परसबागची निर्मिती विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन पेरणी, निंदणी, फवारणी पाणी देणे इत्यादी कामे स्वतः करत असून दैनंदिन अभ्यासात अनुकरण करीत आहेत.
सदर उपक्रमाचे चोपडा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, मुख्याध्यापक व विविध शाखेचे पदाधिकारी यांच्याकडून कौतुक होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम