प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी आणि पंटरला १५ हजारांची लाच घेतांना अटक

बातमी शेअर करा...

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी आणि पंटरला १५ हजारांची लाच घेतांना अटक

जळगावात ACB ची धडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी | जळगावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी (वर्ग–२) राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) आणि त्यांचा साथीदार मनोज बापू गजरे या खाजगी पंटरला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

रावेर येथील एका रुग्णालयाच्या बायो-वेस्ट प्रमाणपत्रासाठी सुर्यवंशी यांनी त्रुटी काढून लाच मागितल्याचे समोर आले. तक्रारदाराने नाशिक कार्यालयातून प्रमाणपत्र मिळवल्यानंतर जळगाव कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी गेल्यावर सुर्यवंशी यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने थेट ACB कडे धाव घेतली.

यानंतर २४ सप्टेंबर रोजी ACB ने सापळा रचत गजरे याच्यामार्फत तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यात आली. लाच स्वीकारताच अधिकारी आणि पंटर दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम