
प्रदेश तेली महासंघाच्या विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची नियुक्ती
प्रदेश तेली महासंघाच्या विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची नियुक्ती
जळगाव प्रदेश तेली महासंघाच्या नाशिक विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरेश सुरळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रदेश तेली महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक नंदुरबार येथे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली या बैठकीत प्रशांत सुरेश सुरळकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी व पदाधिकारी यांनी त्यांची नाशिक विभागाच्या युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा केली. या निवडीमुळे समाजातील तळागाळातील घटकाला न्याय दिल्याची भूमिका अनेकांनी बोलून दाखवली.
प्रशांत सुरळकर यांच्या निवडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी विक्रांत चांदवडकर प्रियाताई महिंद्रे धरणगाव माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी श्यामकांत ईशी आदींसह समाजातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम