प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत

बातमी शेअर करा...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन;

अर्ज करण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत

जळगाव प्रतिनिधी – केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे दिला जाणारा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या शिक्षण, कला, सांस्कृतीक कार्य, खेळ नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार ३१ जुलै २०२५ पर्यंत https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतीक, कार्य खेळ नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव या संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज दिनांक 01 एप्रिल 2025 पासून ते दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत स्विकारण्यात येणार आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम