प्रभाकर कला अकादमीच्या विद्यार्थिनींचा अलख कथ्थक कार्यक्रमात  कलाविष्कार

बातमी शेअर करा...
प्रभाकर कला अकादमीच्या विद्यार्थिनींचा अलख कथ्थक कार्यक्रमात  कलाविष्कार
          जळगाव – येथील प्रभाकर कला संगीत अकादमीतर्फे व. वा. जिल्हा वाचनालय यांच्या सहकार्याने आयोजित ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात अलख या कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी कलाविष्कार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले .
   याप्रसंगी अकादमीच्या संस्थापिका डॉ.अपर्णा भट – कासार, किरण कासार, वाचनालयाचे उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ॲड.अत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
      कार्यक्रमात अनन्या कोष्टी, अनन्या यादव, युक्ता मोरदे, स्मरणिका देवळे, अनुष्का कासार, समृद्धी महेश पाटील, जूनीषा जेठवानी, त्रिवेणी घारगे, आनंदी याज्ञिक, स्वानंदी बोरसे, श्रेया अग्रवाल, समृद्धी दीपक पाटील, तेजस्विनी  क्षिरसागर , मधुरा इंगळे, दीपिका घैसास, हिमानी पिले, ऋतुजा महाजन, कोमल चौहान या विद्यार्थिनींसह स्वतः संचालिका डॉ. अपर्णा भट – कासार यांनीही सहभाग घेत सादरीकरण केले.
    त्यात प्रारंभी गुरुगीता या शंकराचार्यांच्या भज गोविंदम रचनांमधील काही श्लोकाद्वारे गुरुवंदना व शुद्ध नृत्य सादर करण्यात आली. नंतर चैत्र मास बोले रे कोयलिया या गीतावर चैती हा नृत्याविष्कार व भक्तीरसावर आधारित रामवंदना सादर करण्यात आली.
                शक्तीरसावर आधारित देवी आणि ठुमरीद्वारे भाव व्यक्त करण्यात आले. नृत्य, गायन, ताल आणि शब्द या चारही गोष्टींचा सुरेख संगम असलेले चतुरंग या नृत्याचे आणि विरहाचा गहिरा रंग मनात उतरवणारी कजरी या बंदिशचे सादरीकरण करण्यात आले.
         पारंपारिक होळी सणावर आधारित होरी आणि स्वर व तालांचा झंकार म्हणजे तराणाने समारोप करण्यात आला.
       ऋतुजा महाजन या विद्यार्थिनीने आपल्या गुरु व अकादमी विषयी भावना व्यक्त केल्या. निवेदन तृप्ती बाकरे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रीती पाटील यांनी केले. आभार हिमानी पिले हिने व्यक्त केले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम