प्रवीण पाटील यांची अमळनेर युवासेना शहरप्रमुखपदी नियुक्ती

बातमी शेअर करा...

प्रवीण पाटील यांची अमळनेर युवासेना शहरप्रमुखपदी नियुक्ती

पालकमंत्री गुलाबराव पाटील , नवलसिंगराजे पाटील यांच्याहस्ते नियुक्तिपत्र प्रदान

अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि त्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते श्री. प्रवीण पुरुषोत्तम पाटील (साने नगर) यांना युवासेना अमळनेर शहरप्रमुखपदी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यातील युवासेनेला नवी दिशा आणि उर्जा मिळाल्याचे शिवसैनिकांनी व्यक्त केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा वारसा जोपासत, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि जिल्हाध्यक्ष रोहित राधेश्याम कोगटा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. पाटील यांची निवड करण्यात आली असून, “पक्षाच्या वाढीसाठी अखंड परिश्रम घेऊन सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल” असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्ती निमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात प्रवीण पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळा-एरंडोलचे आमदार अमोल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, वैद्यकीय सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र गवळी, तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शहरप्रमुख संजय कौतिक पाटील, वैद्यकीय सेना तालुकाप्रमुख प्रमोद शिंपी, माजी उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, उपतालुकाप्रमुख भूषण कोळी, व्यापारी सेना शहरप्रमुख अमित ललवाणी, तालुका संघटक गजेंद्र जाधव, प्रसिद्धी प्रमुख अनिल पवार तसेच शिवसेना अल्पसंख्याक शहरप्रमुख शोएब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व घोषणाबाजी करत प्रवीण पाटील यांचे जोरदार स्वागत केले. नव्याने नियुक्त शहरप्रमुखांनी “शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या विचारधारेनुसार युवकांना संघटित करून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” अशी भावना व्यक्त केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम