प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या कार्यालयीन कामकाजात करावा -प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

बातमी शेअर करा...

प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या कार्यालयीन कामकाजात करावा -प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या कार्यालयीन कामकाजात करून विद्यार्थ्यांना सहकार्य करून आपल्या महाविद्यालयातील प्रतिमा उज्वल करावी असे प्रतिपादन प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी केले.

प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदानातून विद्यापीठाशी संलग्नित ‍ महाविद्यालयांमधील वर्ग – २ व वर्ग -३ कर्मचाऱ्यांसाठी आर्यन पार्क, जळगाव येथे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी आज दि. १३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १० वाजता केले. यावेळी कुलसचिव डॉ.विनोद पाटील व अधिसभा सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम उपस्थित होते.

या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात आनंद गौतम जळगाव, राहूल शिंदे एमकेसीएल, पुणे यांचेकडून ॲडव्हान्स ऑफिस ॲटोमेशन व जनरेटिव्ह ए.आय. या विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. ॲङ संध्या पाटील यांचेकडून मानसोपचार या विषयावर तर गिरीष कुलकर्णी यांचेकडून कार्यसंस्कृती या विषयावर प्रशिक्षण पहिल्या दिवशी देण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी योगा व ध्यानधारणा, आधुनिक जीवनातील शारिरीक व मानसिक आरोग्य,सायबर सुरक्षा व समाज माध्यमे, सहसंचालक कार्यालयाची कार्यपध्दती या विषयांवर अनुक्रमे एकनाथ नन्नवरे, डॉ. माधुरी कासट, योगेश पाटील सायबर एक्सपर्ट, अजय शिवरामे व नंदू चव्हाण सहसंचालक कार्यालय जळगाव यांचेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. समारोपाला कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन कुलसचिव कार्यालयाचे उपकुलसचिव एन. जी. पाटील, आय.बी. सामुद्रे, गुलाब पाटील व एस.बी. पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम