प्राध्यापकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

बातमी शेअर करा...

प्राध्यापकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

दोन दिवसीय “टीचर कॅपॅसिटी बिल्डिंग” वर्कशॉप : प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा), नवी दिल्ली तसेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात दोन दिवसीय ‘टीचर कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर प्रा. डॉ. एस. एस. राजपूत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल अध्यक्षस्थानी होत्या. तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, “शिक्षक हा मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकारासारखा असतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सुसंस्कार, नीतिमूल्ये आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांची नक्षी उमटविण्याची जबाबदारी शिक्षकाची असते. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या तेजाचा, बुद्धीचा आणि वृत्तीचा असतो. त्यातील सुप्त गुण ओळखून त्याला योग्य दिशा देणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. तसेच त्यांनी शिक्षकांना बदलत्या शिक्षण पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा, रोजगाराभिमुख शिक्षण, मेजर-मायनर प्रोग्राम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, मल्टी डिसिप्लिन अॅप्रोच या दिशेने महाविद्यालय सातत्याने पुढे जात असल्याचे सांगितले. तसेच परीक्षा विभागातील प्रगतीशील बदलांवर प्रकाश टाकत, पारदर्शकता, गतीशीलता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या सुधारणांची माहिती दिली. यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. एस. एस. राजपूत यांनी शिक्षकांच्या क्षमतावृद्धीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “शिक्षण क्षेत्रातील सतत बदलणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे शिक्षकांना नवे ज्ञान, तंत्र आणि अध्यापन पद्धती आत्मसात करण्याची संधी मिळते. शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक असतो आणि त्यांच्या प्रगतीतूनच विद्यार्थ्यांचा व देशाचा विकास घडतो.”असे सांगितले यानंतर या दोन दिवसीय कार्यशाळेतील पहिल्या सत्रामध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील आयक्यूएसी डीन प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी आउटकम-बेस्ड एज्युकेशन : क्राफ्टिंग क्लियर, मेजरेबल अँड अॅचीवेबल टार्गेट या विषयावर तर कबचौ उमवितील माजी अधिष्ठाता प्रा डॉ. आर. एस. पाटील यांनी रोल ऑफ टीचर्स इन इम्प्लिमेंटेशन ऑफ एनईपी अँड डिजिटल लर्निंग तसेच रायसोनी महाविद्यालयातील डेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील यांनी क्रिएटिंग इंटरअॅक्टिव्ह कॉन्टेंट विथ एआय : टेक्स्ट टू व्हिडिओ व कबचौ उमवितील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राम भावसार यांनी टीचिंग इन द एज ऑफ एआय: संधी, आव्हाने आणि मार्गदर्शक दिशा यावर मार्गदर्शन केले तर दुसऱ्या दिवसाच्या सत्रात मुंबई येथील एस. पी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच येथील आर. अँड डी.चे डीन प्रा. डॉ. किरण भोळे यांनी नॅव्हिगेटिंग फंडिंग एजन्सीज : मिशन, प्रायोरीटीज अँड अॅप्लिकेशन व आर्टिक्युलेटिंग रायट-अप फॉर इफेक्टिव्ह रिसर्च आर्टिकल्स अँड एथिक्स यावर मार्गदर्शन केले तर नागपूर येथील सॉफ्ट स्किल ट्रेनर श्री. तुषार मुळे यांनी द टीचर इन यू : नर्चरिंग फॅशन, पर्पज अँड पेडगॉजी तसेच क्युरिऑसिटी अनलीश्ड: द जॉय ऑफ लर्निंग या विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन करून शिक्षकांना नवीन दृष्टीकोन दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवाणी तर आभारप्रदर्शन अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी केले. या कार्यशाळेत तिन्ही जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशिक्षण सत्रांमध्ये नवीन अध्यापन पद्धती, डिजिटल साधनांचा वापर, शिक्षकांच्या नेतृत्वगुणांचा विकास या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम