
प्रा. जे. व्ही. साळी यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड
जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भौतिकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. जे. व्ही. साळी यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम ३०(४)(ई) अंतर्गत ही निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी पुढील एक वर्षासाठी त्यांची व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशन केले आहे.
प्रा. साळी यांच्या निवडीमुळे विद्यापीठाच्या कामकाजाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम