
प्रा. डॉ. सतीश आधार पाटील यांचे “Basics in Cell Biology” पुस्तक जर्मनीत प्रकाशित
प्रा. डॉ. सतीश आधार पाटील यांचे “Basics in Cell Biology” पुस्तक जर्मनीत प्रकाशित
तांदळवाडी ता. चोपडा प्रतिनिधी I येथील रहिवाशी गुर्जर समाज भूषण शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे गेल्या २७ वर्षांपासून वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. सतीश आधार पाटील यांचे “Basics in Cell Biology” हे पुस्तक नुकतेच आंतरराष्ट्रीय जर्मनी येथील नामवंत लॅम्बर्ट अकॅडेमिक पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित झाले आहे.
सदर पुस्तक हे बी.एस्सी., एम.एस्सी. तसेच विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
याआधी त्यांनी प्रशांत पब्लिकेशन, जळगाव या माध्यमातून वनस्पतीशास्त्र विषयाशी संबंधित एकूण १२ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांना विद्यापीठाकडून गेल्या १० वर्षांपासून वनस्पतीशास्त्र विषयासाठी पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ४ विद्यार्थी संशोधन कार्य करत आहेत.
तसेच उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरणाबद्दल त्यांना ३ राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे महाविद्यालयीन तसेच शैक्षणिक क्षेत्रात गौरव व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम