प्रा. तुषार देशमुख यांची त्रिमुर्ती फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य म्हणुन नियुक्ती

बातमी शेअर करा...

प्रा. तुषार देशमुख त्रिमुर्ती फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य म्हणुन नियुक्ती
पाळधी ता. धरणगाव ;- येथील नामांकित त्रिमुर्ती शिक्षण समुहाच्या फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य म्हणुन डॉ. तुषार देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी त्रिमुर्ती शिक्षण समूहाचे अध्यक्ष मनोज पाटील सरांनी त्यांची नियुक्ती केली व तशी रितसर नियुक्ती पत्र दिले.
अध्यक्ष मनोज पाटील सर म्हणाले की, देशमुख सरांच्या अनुभवाचा फायदा संस्थेला होईल व प्रगति पथावर असलेली त्रिमुर्ती संस्था अजुन जास्त वेगाने प्रगती करेल अशी आशा बाळगतो.
श्री देशमुख सरांच्या प्राचार्य पदाचा १२ वर्षाचा व प्राध्यापक म्हणुन १० वर्ष असा सुमारे २० ते २२ वर्षाचा अनुभव संस्थेच्या खुप कामी येईल.
सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी देशमुख सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

त्रिमुर्ती फार्मसी कॉलेजला अतिउत्कृष्ठ मानांकन

पाळधी येथील त्रिमुर्ती शिक्षण समूहाची फार्मसी कॉलेजला २०२४-२५ चे अतिउत्कृष्ठ मानांकन प्राप्त झाले आहे.
हे मानांकन महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळ कडून देण्यात आले आहे. २०१६ त्रिमुती फार्मसी संस्था स्थापन झाली तेव्हा पासून १२ अतिउत्कृष्ठ नामांकन म्हणजे “Very Good” असा Report संस्थेला मिळतो. दरवर्षी MSBTE हे मार्च एप्रिल मध्ये सर्वेक्षण करत असते व जुलै ऑगस्ट मध्ये हे मानांकन देण्यात येते.

त्रिमुर्ती फार्मसी संस्थेला “Very Good” शेरा प्राप्त झाला याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोज पाटील सर म्हणाले, आम्ही गुणवत्ता पुर्ण शिक्षणावर भर देतो तसेच गुणवत्ता असलेले शिक्षक असल्यामुळे हे शक्य होते. श्री. मनोज पाटील सरांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. असेच मानांकन दरवर्षी आम्ही प्राप्त करू, अशी ग्वाही देतो

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम