प्रेमाचे आमिष दाखवून दोन महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल

बातमी शेअर करा...

प्रेमाचे आमिष दाखवून दोन महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल

मुक्ताईनगर तालुक्यातील घटनेमुळे खळबळ

 

जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात दोन महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलवर नग्न व्हिडिओ रेकॉर्ड करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित श्रीकृष्ण अनिल चिखलकर याने २५ एप्रिलपूर्वी तालुक्यातील एका गावातील ३६ वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला व्हिडिओ कॉलद्वारे विवस्त्र होण्यास भाग पाडले व तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका तरुणीशीही अशाच प्रकारे फसवणूक करून तिचेही अश्लील व्हिडिओ बनवले.

संशयिताने हे दोन्ही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचे निदर्शनास आल्यावर पीडित ३६ वर्षीय महिलेनं मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून श्रीकृष्ण चिखलकरविरुद्ध संबंधित कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम