
प.पू. उपाध्याय प्रवीणऋषीजी यांना जैन श्रावक संघातर्फे ‘आदराची चादर’ अर्पण
होळी चातुर्मासानिमित्त धार्मिक कार्यक्रम सादर
प.पू. उपाध्याय प्रवीणऋषीजी यांना जैन श्रावक संघातर्फे ‘आदराची चादर’ अर्पण
होळी चातुर्मासानिमित्त धार्मिक कार्यक्रम सादर
जळगाव, (प्रतिनिधी) – श्रमण संघीय उपाध्याय प्रवर प.पू.प्रवीण ऋषीजी एक बहुआयामी व्यक्तित्व आहे। एक प्रगल्भ वैचारिक व्यक्तित्व, एक मनोवैज्ञानिक, एक तत्त्वज्ञानी, एक धर्मगुरु आणि फक्त एका शब्दात सांगायचे असेल तर ते एक प्रेरणादायी व्याख्याते आहेत. धर्मसंदेश देत सेवाभाव व उत्कृष्ठ आचरण भाव जागृत करण्याचे काम ते नियमीत करतात. ‘अर्हम विज्जा’ या आंतरराष्ट्रीय शैक्षिक प्रकल्पाचे ते प्रणेते असून देश विदेशात त्यांचे हजारो प्रशिक्षक व्यक्तीमत्त्व विकासाचे आणि एकूणच मानव उत्थानाचे कार्य समाजात अविरतपणे करीत आहेत. त्यांचा वार्षिक चातुर्मास पुणे येथे असून केवळ जळगावकरांच्या प्रेमापोटी ते इतका लांब विहार करून आले व होळी चातुर्मासानिमित्त धार्मिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या व त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जळगावच्या श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे त्यांना आदरयुक्त भावनेने चादर अर्पण करण्यात आली.
जळगावकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे, सहसा अशी मानाची चादर मी कधी स्वीकारत नाही परंतु माहीत नाही येथे मी नकार देऊ शकत नाहीये. धर्म मार्गावर असेच पुढे मार्गक्रमण करत रहा. अशोकभाऊच्या रुपाने चांगले नेतृत्व सुरेशदादा आणि दलुभाऊंनी तुम्हा जळगावकरांना दिलेले आहे. त्यांच्या हातांना बळ द्या असे आवाहन मी तुम्हाला करतो. भारत देशात जळगावचा संघ हा आदर्श संघ ओळखला जातो ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी पुढील पिढीची आहे याचे भान ठेवा, असे महाराजांनी निक्षून सांगितले. यावेळी प.पू. तीर्थेशऋषीजी महाराज साहेब यांनी श्रवणीय भजन सादर केले. तसेच सुरेशदादा जैन, दलिचंद जैन, अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त करत आदराची चादर अर्पण केली.
यावेळी पूर्व मंत्री सुरेशदादा जैन, सकल श्री संघाचे संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्वर्ण उद्योजिका नयनतारा बाफना, माजी महापौर प्रदीप रायसोनी, ताराबाई डाकलिया, विजयराज कोटेचा, सुरेंद्र लुंकड, कांतिलाल कोठारी, दिलीप चोपडा, सुरेश टाटीया, ताराबाई रेदासनी, ज्योती अशोक जैन, भारती प्रदीप रायसोनी, माजी नगरसेवक अमर जैन, नंदलाल गादिया, ममता कांकरिया, अजय राखेचा, शांतीलाल बिनायक्या, संध्या कांकरिया, पुष्पा बनवट, किरण बोरा, जितेंद्र कोठारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सीए अनिल कोठारी यांनी केले. सदाग्यान मंडळाने भजन सादर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रेयस कुमट, नरेंद्र बंब, उदय कर्णावट, कपिल बोरा, सचिन जैन, कमलेश बोरा आदींनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम