प.पू. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते लाठी काठी प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

जळगाव जिल्हा मर्दांनी स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव व सरदार जी.जी. स्पोर्ट्स क्लब च्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी महिलांच्या सक्षमीकरण साठी लाठी काठी प्रशिक्षण शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सतपंथ आश्रम फैजपूरचे प. पू. स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांचे हस्ते शस्त्र पूजन करून करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन डॉ. दत्तप्रसाद दलाल हे होते.

यावेळी जळगाव जिल्हा मर्दांनी स्पोर्ट्स असोसिएशनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप पाटील, उपाध्यक्षपदी अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, सचिव युवराज माळी असल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सुरेश धनके, राजेंद्र शेठ अग्रवाल, अक्षय अग्रवाल, ऋषिकेश महाराज, संतोष अग्रवाल, कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पुराणिक, डॉ. संध्या वानखेडे, डॉ. रूपाली महाजन, गायत्री कोळी, चौधरी मॅडम, दिलीप पाटील, अरुण शिंदे, रविंद्र पाटील, नितीन पाटील, दिपक नगरे, कांतीलाल महाराज, सी. एस. पाटील व शहरातील मान्यवर उपस्थित होते
प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी युवराज माळी, भूषण चौधरी, अजय महाजन, प्रतिक खराले, जयेश बिरपन व सरदार जी जी स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू परिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम