प. वि. पाटील विद्यालयात रंगला पतंग महोत्सव
विद्यार्थ्यांनी एकमेकांना तिळगुळ देऊन दिल्या शुभेच्छा
प. वि. पाटील विद्यालयात रंगला पतंग महोत्सव
विद्यार्थ्यांनी एकमेकांना तिळगुळ देऊन दिल्या शुभेच्छा
जळगाव I प्रतिनिधी
के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे मकर संक्रांति हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीचे महत्त्व पटवून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी यावेळी विविध प्रकारचे आकर्षक असे पतंग उडवले. सर्व शिक्षक तसे शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा या चिमुकल्या विद्यार्थ्यासोबत पतंग उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम