प. वि. पाटील विद्यालयाला ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेत यश

बातमी शेअर करा...

प. वि. पाटील विद्यालयाला ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेत यश

जळगाव – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न संस्था बालरंगभूमी परिषद तर्फे आयोजित इतिहास महाराष्ट्राचा – श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक सोहळा या स्पर्धेत केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली.

शाळेच्या एकल सादरीकरणामध्ये विद्यार्थिनी आराध्या गणेश पाटील हिने प्रथम क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले. तर शाळेच्या संघाला उत्कृष्ट (द्वितीय) असे पारितोषिक मिळाले. या संघात नारायणी ललितकुमार बडगुजर, योजना दिनेश सुरडकर, लावण्या युवराज पाटील, प्रियल चेतन कोळी, रुद्राणी मनोहर बडगुजर, सिद्धी चेतन पाटील, सोहम सतिश नाईक, सोहम आनंद बाविस्कर, तनुश्री चेतन सोनार, अंशरा रहेमान तडवी या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

विद्यार्थ्यांना उपशिक्षक योगेश सुपडू भालेराव यांचे मार्गदर्शन, तसेच उपशिक्षक सूर्यकांत पाटील, भावना धांडे आणि सीमा गोडसे यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम