प.वि. विद्यालयाची शस्त्र प्रदर्शनाला भेट
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजन
प.वि. विद्यालयाची शस्त्र प्रदर्शनाला भेट
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित शस्त्र ,श्वान पथक ,वायरलेस ,पोलीस बँड ,बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रदर्शनास केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
सदर भेटीत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे शस्त्र स्वतः च्या हातात घेऊन अनुभवले , मेटल डिटेक्टर तसेच श्वान पथक कसे कार्य करते ते बघितले त्यात विविध प्रकारच्या बंदुका प्रत्यक्ष हाताळायला मिळाल्याने विद्यार्थी अतिशय आनंदी झाले त्यांनी उत्सुक्तने सर्व शस्त्रांची माहिती जाणून घेतली.
प्रसंगी शाळेच्या मुख्या. धनश्री फालक ,उपशिक्षक योगेश भालेराव, सूर्यकांत पाटील, गायत्री पावर, सिमा गोडसे आदी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम