फरकांडे येथे लम्पीमुळे शेतकऱ्याची गाय दगावली; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पंचनामा

बातमी शेअर करा...

फरकांडे येथे लम्पीमुळे शेतकऱ्याची गाय दगावली; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पंचनामा

फरकांडे, ता. एरंडोल (प्रतिनिधी) : लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, या रोगामुळे एका शेतकऱ्याची गाय मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. शिवाजी शांताराम चौधरी यांच्या मालकीची गाय काही दिवसांपासून आजारी होती. अखेर तिचा मृत्यू झाला. कासोदा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्राप्ती पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुचिकित्सक पी. डी. पाटील यांनी मृत गायीचा पंचनामा केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीमार्फत लसीकरण मोहिमही राबवण्यात आली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम