फिरती विज्ञान प्रयोगशाळा अमळनेर तालुक्यातील विविध शाळांमध्ये पोहोचली

बातमी शेअर करा...

फिरती विज्ञान प्रयोगशाळा अमळनेर तालुक्यातील विविध शाळांमध्ये पोहोचली

जळगाव (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची फिरती विज्ञान प्रयोगशाळा दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी अमळनेर तालुक्यातील विविध शाळांमध्ये पोहोचली. दोन दिवसांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी आणि मा. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून आदिवासी ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयांमध्ये प्रायोगिक अनुभव मिळतो, त्यांची शैक्षणिक आवड वाढते आणि विज्ञानातील नवनवीन संकल्पना प्रत्यक्ष पाहून समजून घेण्याची क्षमता विकसित होते

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे समन्वयक डॉ. एस. एस. घोष यांनी प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. एल. ए. पाटील यांच्याशी संपर्क साधून या भेटीचे आयोजन केले. दोन्ही दिवसांत मिळून १५०० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगशाळेला भेट दिली. या उपक्रमांसाठी डॉ. भावेश पाटील, राहुल हजारी, मयुरी गिरासे, अक्षय सैंदाणे आणि रोहित भोई यांनी योगदान दिले. तसेच, बसमधील सुमारे ३० पेक्षा जास्त प्रयोगांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि त्यांच्या शंकाचे निरसन केले.

२७ सप्टेंबर २०२५ रोजी, फिरती विज्ञान प्रयोगशाळेने लोकमान्य विद्यालय, अमळनेर येथील २१२ विद्यार्थ्यांना आणि साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथील ८४० विद्यार्थ्यांनी भेट देऊन विज्ञान विषयांचा प्रात्यक्षिक अनुभव दिला. या दिवशी एकूण १०५२ विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत प्रत्यक्ष भेट देऊन विज्ञानाशी संबंधित प्रयोग आणि उपकरणांचा अनुभव घेतला. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस.ए. पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ भूविज्ञान विभागाचे प्रा डॉ. भास्कर पाटील, यांच्यासह लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेक भाडेकर, प्रा. डॉ प्रभाकर जोशी, कार्याध्यक्ष राजाभाऊ खाडिलकर, मुख्याध्यापक जे. जी. चौधरी, मनीष खांडोळकर, मनोहर महाजन, भुषण महाजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

२८ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, पिंपळे बुद्रुक येथील ३१५ विद्यार्थी आणि कै. प्रज्ञावंत आबा सो. मेसेज पाटील अनुदानित प्राथमिक व कै. अण्णा हिराजी पाटील अनुदानित माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, तोडपुरा येथील १३३ विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दोन्ही दिवसांत मिळून एकूण १५०० विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित प्रयोग, उपकरणे आणि माहितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी, प्रयोगात्मक कौशल्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया शाळेच्या शिक्षकांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम