
फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणीसाठी जळगाव ची अर्शिया व पार्थ ची निवड
फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणीसाठी जळगाव ची अर्शिया व पार्थ ची निवड
राजमाता जिजाबाई ट्रॉफी फुटबॉल महिला राष्ट्रीय स्पर्धा (खुला गट )गुजरात येथे १४ सप्टेंबर पासून होत असून त्यासाठी प्रारूप महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला असून त्यात जळगावची अर्शिया तडवी या एकमेव खेळाडूंची निवड झाली असून तिचे प्रशिक्षण शिबिर २५ ऑगस्ट पासून कुपरेज फुटबॉल मैदान मुंबई येथे होणार असल्याने आज आर्शिया तडवी ला फुटबॉल संघटनेतर्फे निरोप देण्यात आला.
नुकत्याच शिरपूर येथे १४ वर्षातील मुलांच्या आंतर जिल्हा स्पर्धेत सुद्धा महाराष्ट्र संघासाठी प्रारूप निवड करण्यात आली असून त्यात सुद्धा जळगावचा पार्थ पाटील याची निवड झाली असून त्याचे सुद्धा प्रशिक्षण शिबिर उपरे येथे लवकरात सुरू होणार आहे
अशा निवड झालेल्या दोघी खेळाडूंना आज जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख व मुख्य प्रशिक्षक राहील अहमद सह चिमुकला खेळाडू अली उमर यांनी शुभेच्छा दिल्या.
दोघी खेळाडूंचे संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक भाऊ जैन, संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर अनिता कोल्हे, वरिष्ठ उपाध्यक्ष उद्योगपती जफर शेख व इम्तियाज शेख, खजिनदार शेखर देशमुख, सहसचिव छाया बोरसे संचालक ताहेर शेख, मनोज सुरवाडे व भास्कर पाटील आदींनी अभिनंदन केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम