फुपणीत किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

बातमी शेअर करा...

फुपणीत किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

जळगाव, 27 मे 2025: जळगाव तालुक्यातील फुपणी गावात 24 मे 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यात एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. दोन्ही गटांच्या तक्रारींवरून तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिली तक्रार: रविंद्र यशवंत सपकाळे (वय 49, रा. फुपणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील संदीप जनार्दन सपकाळे, गजानन तुकाराम सपकाळे, रविंद्र रघुनाथ सपकाळे आणि संदीप प्रवीण पाटील यांनी त्यांना धक्काबुक्की, अश्लील शिवीगाळ आणि मारहाण केली. यावरून तालुका पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोहेकॉं बापू पाटील तपास करत आहेत.दुसरी तक्रार: प्रतिभा संदीप सपकाळे (वय 32, रा. फुपणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रवीण यशवंत सपकाळे, रविंद्र यशवंत सपकाळे, बंटी प्रवीण सपकाळे आणि सोनू सपकाळे यांनी त्यांना धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले. यावरून संशयितांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम