फैजपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी

बातमी शेअर करा...

फैजपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी

फैजपूर प्रतिनिधी नगरपरिषद निवडणूक–२०२५ च्या अनुषंगाने शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून शनिवारी (२९ नोव्हेंबर) सायंकाळी पोलिसांनी दोन तासांची अचानक नाकाबंदी करून निवडणूक वातावरणात सुरक्षेचा संदेश दिला. सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, सुभाष चौक आणि डी.एन. कॉलेज परिसरात पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगूजर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोउपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, निरज बोकील, विनोद गाभणे यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच SRPF च्या एका पूर्ण सेक्शनने तपासणी मोहीम राबवली.

निवडणूक काळात अवैध वाहतूक, आर्थिक देवाणघेवाण, गुंडगिरी अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार रोखण्यासाठी ही नाकाबंदी उपयुक्त ठरली. अनेक संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फैजपूर परिसरात आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या आणखी तपासण्या सुरू राहणार असल्याचेही संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम