
फोटोग्राफी क्षेत्रात झालेले बदल लक्षणीय – डॉक्टर विकास हरताळकर
फोटोग्राफी क्षेत्रात झालेले बदल लक्षणीय – डॉक्टर विकास हरताळकर
चोपडा (प्रतिनिधी) फोटोग्राफी क्षेत्रात झालेले बदल लक्षणीय आहेत. हे बदल अनुभवताना तालुक्यात एवढे सारे फोटोग्राफर बंधू या व्यवसायात आहेत याचा फार मोठा आनंद आहे. असे प्रतिपादन ख्यातनामशल्यचिकित्सक डॉक्टर विकास काका हरताळकर यांनी येथे केले. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहातआज दिनांक 19 रोजी दुपारी बारा वाजता आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
फार पूर्वी दोन-तीन फोटोग्राफर शहरात फोटोग्राफीचा धंदा करत होते. कवी कुमार यांनी काढलेले चित्र पुरस्कारासाठी निवडले गेले. अलीकडे मात्र अपघाताचे फक्त फोटो काढले जातात अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम फार कमी लोक करतात. याविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास तहसीलदार भाऊसाहेब थोरात, शहर पोलीस स्टेशनचे पीआय मधुकर साळवे, चोपडा नगरपालिकेचे गटनेते जीवन भाऊ चौधरी, उद्योजक विश्वनाथ अग्रवाल, शेतकी संघाचे प्रेसिडेंट, सुनील डोंगर पाटील, दिवंगत सैनिकाच्या धर्मपत्नी गं. भा. शामल चौधरी, सूतगिरणीचे माजी संचालक तुकाराम बापू पाटील, शेतकी संघाचे संचालक प्रल्हाद पाटील व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रम प्रारंभी स्वागत गीत व दीप प्रज्वलन करण्यात आले. शहरातील दिवंगत फोटोग्राफर यांना सभेत योगेश बैरागी, भागवत पाटील, प्रशांत चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत
सुशांक डिजिटल चे संचालक छोटू वारडे, राजेंद्र पाटील, अजहर तेली, जावेद भाई शेख, प्रमोद पाटील , योगेश राजपूत विनोद जाधव आदींनी केले. यावेळी प्रास्ताविका कवी लेखक तथा साहित्यिक रमेश जे .पाटील यांनी फोटोग्राफी व्यवसायाचा आपल्या स्वतःचा अनुभव कथन केला. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यावेळी बोलताना म्हणाले की, अलीकडे फोटोग्राफी म्हटली म्हणजे वर वधू पक्षाचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते, पण विवाहा दि समारंभ फोटोग्राफर शिवाय होतच नाही? या दिनाचे महत्त्व जागतिक पातळीवर फार मोठे आहे.
या कार्यक्रमात वीर पत्नी शामल चौधरी यांना डॉक्टर हरताळकर, व तहसीलदार थोरात यांनी गौरविले, पूजा रवींद्र पावरा या विद्यार्थिनीलाही यावेळी गौरविण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी, बापू महाजन, पप्पू बडगुजर, नाना सोनगिरे, प्रकाश पाटील, उमेश पाटील, विनोद मोरे, हेमकांत देवरे, राजेश भाई पाटील, प्रशांत चांदे, आशिष पाटील, सुरेश चौधरी शाकीर शेख, ऋषिकेश पाटील, प्रदीप कोळी, मुजमील शेख, भरत राजपूत, जावेद शेख, लीलाधर पाटील आदींनी परिश्रम घेतले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम