फोन पे ने टक्केवारी स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना आ. प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांचा थेट जाब

"चोपडा बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा उघड विस्फोट ... !

बातमी शेअर करा...

“फोन पे”ने टक्केवारी स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना आ. प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांचा थेट जाब

चोपडा बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा उघड विस्फोट … !

चोपडा | प्रतिनिधी

चोपडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्यापासून, उप अभियंता व लेखा परीक्षक (ऑडिटर) हे ठेकेदारांना वेठीस धरून अगोदर टक्केवारी दया मगच कामे होतील अशी अशी आडमुठे धोरण अवलंबून टक्केवारीची रक्कम चक्क फोन पे ने स्विकारीत असल्याचा धक्कादायक प्रकार दैनिक बातमीदार मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

याबाबत कार्यसम्राट आ. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी दि. १० जानेवारी रोजी चोपडा येथे आयोजित आढावा बैठकीत या मुद्द्यांवरून बांधकाम विभाग उपअभियंता विरेंद्र राजपूत यांना या प्रकाराबाबत जाब विचारला असता उपअभियंता विरेंद्र राजपूत यांनी टेस्ट रिपोर्टसाठी पैसे घेतल्याचे सांगून गुळमुळीत उत्तर दिल्यावरून

आमदार चंद्रकांत अण्णा सोनावणे यांनी असे टेस्ट रिपोर्ट साठी पैसे घेण्याचा अधिकार असतो का? असा सवाल केला असता उपअभियंता विरेंद्र राजपूत यांची भंबेरी उडाली होती.

 

फोन पे ने टक्केवारी: भ्रष्टाचाराचा नवा ट्रेंड

सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कनिष्ठ अभियंता यांनी ठेकेदारांकडून टक्केवारी मागणीसाठी चक्क फोन पेचा वापर केल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. एका ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार, बिल मंजुरीसाठी “अगोदर टक्केवारी द्या, नाहीतर काम पुढे सरकणार नाही,” असे स्पष्ट सांगण्यात येते.

“मॅडम”च्या छत्रछायेखाली टक्केवारीचा खेळ?

संबंधित अधिकाऱ्यांवर ठेकेदारांकडून “मॅडम” नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही टक्केवारी दिल्याचा आरोप आहे. यामुळे कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा यांचेही नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे. भ्रष्टाचाराचे प्रकार सुरू असूनही त्यांनी अद्याप ठोस कारवाई केलेली नसल्याने त्यांच्या भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा यांना दिले आहेत. मात्र कार्यकारी अभियंत्यांवरच भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडालेले असतांना त्याच चौकशी अधिकारी नेमल्याने या प्रकणाची कितपत निष्पक्ष चौकशी होईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम