फोनवर बोलताना दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; एमआयडीसीत घटना 

बातमी शेअर करा...

फोनवर बोलताना दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; एमआयडीसीत घटना 

जळगाव – एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील के. एस. कोल्ड कंपनीच्या आवारात मंगळवारी रात्री झालेल्या दुर्घटनेत एका तरुण कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताची ओळख उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील ओडणी येथील मंगलसिंग रामलखन सरोज (वय २७) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगलसिंग सरोज हा कंपनीत काम करत असून त्याच परिसरात वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री तो फोनवर बोलण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर गेला असताना अचानक तोल जाऊन तो खाली कोसळला. पडताना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागेवरच गंभीर जखमी झाला.

सोबतच्या कामगारांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान डोक्याच्या मोठ्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम